पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार देवराव भोंगळे सरसावले!
भाजपच्या विजयासाठी गोंडपिपरीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ; मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारीला वेग दिला आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गोंडपिपरी येथे आयोजित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. मतदारांशी थेट संपर्क साधून पक्षाची भूमिका आणि उमेदवाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात मार्गदर्शन केले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची असून, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
*भाजपच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन*
*निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गोंडपिपरी तालुक्यात संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. मतदारांची माहिती संकलित करणे, पदवीधर मतदारांशी संपर्क साधणे आणि मतदानासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, यावर बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.*
यावेळी भाजपचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते म्हणाले, “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सक्षम असून, त्यांच्या प्रचारासाठी आम्ही कंबर कसली आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने काम करीत आहेत. विजय आमचाच होणार, हा विश्वास आहे.”
*भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती*
या बैठकीला भाजपचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, महामंत्री निलेश संगमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष तथा नोंदणीप्रमुख राकेश पून, निलेश पुलगमकर, भानेश येगेवार, नगराध्यक्ष अश्विनी तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, नगरसेवक अनिल झाडे, गणेश मेरुगवार, ज्येष्ठ नेते बबन निकोडे, दीपक बोनगिरवार, उपसभापती स्वप्नील अनुमुलवार, राकेश सातपुते, प्रवीण धोडरे, वैभव बोनगिरवार, शशिकांत पील्लारे, सचिन चिंतावार, उपनगराध्यक्ष सारिका मडावी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून, आगामी काळात प्रचाराला अधिक गती देण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.



