हजारो भाविकांनी अनुभवला भक्तीचा अनोखा सोहळा
जिल्हा बँकेचे संचालक उल्हास करपे यांचे आयोजन, _गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरीत उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- अध्यात्मातून प्रबोधनाचा ध्यास घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक उल्हास करपे यांनी सुमारे एकेवीस वर्षापुर्वी चेकपिपरी येथे जगन्नाथ महाराज देवस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. आज हा परिसर हजारो भक्तांचे श्रध्दास्थान बनला आहे. दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी अतिशय भक्तीभाावाचा मळा फुलवित भजन,धार्मीक प्रवचन व संगीताच्या तालात चेकपिपरी गावं भक्तीभावमय झाले. यावेळी अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
गोंडपिपरीहून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपिपरी येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष उल्हास करपे यांनी जगन्नाथ महाराज देवस्थानाची निर्मीती केली. या देवस्थानाच्या माध्यमातून धार्मिक सोबतच सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी स्थापनेला 21 वर्ष झालीत. त्यानिमीत्ताने चेकपिपरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 15 तारखेला श्री मारोती महाराज हळस्ती यांच्या हस्ते घट स्थापना करण्यात आली. यांनतर 16 ऑक्टोबर ला सकाळी चेकपिपंरी गावातून पालखी पदयात्रा काढण्यात आली. यात अनेकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पंचकुंडी गायत्री यज्ञ करण्यात आले. दुपारी ह.भ.प. सुवर्णाताई पिंपळकर यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सायंकाळी महाप्रसाद व घुगरीकाला चे वितरण करण्यात आले. सोबतच भक्तीरसाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्राचे ख्यातनाम तबलावादक डॉ. देवेंद्र यादव, महाराष्ट्राचे भजनसम्राट पंडित रंकनाथ वैरागकर यांचे शिष्य अविनाश कन्नाके, ह. भ. प. सुवर्णाताई पिंपळकर यांनी भक्तीरसातून भक्तांना भक्तीची साद घातली. यावेळी उपस्थित भाविक भारावून गेले. भक्तीत तल्लीन झाले.
या संपूर्ण कार्यक्रमात संत सोनामाता यांनी काला आरती च्या माध्यमातून लोकांना भक्तीचा संदेश दिला. दरम्यान हनुमान वासेकर, झाडे मॅडम, कुंभारे मॅडम यांनी भजन कार्यक्रम घेतला. रात्री साई म्युझिकल आर्केस्ट्रा च्या माध्यमातून मनोरंजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राजुरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार संजय धोटे, पांडुरंग जाधव, जयंत टेम्भूर्डे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक उल्हास करपे यांच्यासोबत संदीप करपे, किशोर अगस्ती, श्रीकांत मलोझलवार, ईशान करपे, रिना करपे, इरा करपे यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी विविध उपक्रम घेण्यात आले.



