ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आकृतिबंध रद्द करण्यासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

मुद व जलसंधारण विभागातील संघटना आक्रमक ; ३ नोव्हेंबरपासून आंदोलनाची घोषणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – राज्य शासनाने मंजूर केलेला मुद व जलसंधारण विभागाचा नवीन आकृतिबंध रद्द करावा, या मागणीसाठी कनिष्ठ अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य आणि राजपत्रित अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ३ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनाची सुरुवात २६ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, ३ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात विभागातील वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ मधील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतिबंधात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांबाबत तसेच पदांच्या वर्गीकरणाबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. नवीन आकृतिबंधामुळे विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितावर परिणाम होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.

नवीन आकृतिबंधाबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

आकृतिबंध रद्द करण्याच्या मागणीवर शासन काय भूमिका घेते, याकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने वेळेत तोडगा काढला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये