Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बुलेट चालवण्याच्या छंदामुळे दोन अल्पवयीन बालकांनी केली बुलेट चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- दि. 15/11/2024 रोजी आसिफ अली जेसानी , रा. गुजरी वॉर्ड, ब्रह्मपुरी यांची रात्रीच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर ठेवलेली हिरव्या रंगाची बुलेट इन्फिल्ड कंपनीची क्रमांक MH 27 DD 4060 किं. 1,00,000/- रुपये ही कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेली आहे तिचा शोध घेतला असता मिळून न आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 552/24 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

        सदर गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेतला असता आवळगाव ता. ब्रह्मपुरी येथील दोन अल्पवयीन बालकांनी बुलेट चालवण्याच्या छंदामुळे चोरी केल्याचे कबूली दिली. अल्पवयीन बालकाकडून चोरी केलेली बुलेट व गुन्ह्यात चोरी करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे..

सदरची कारवाई माननीय दिनकर ठोसरे एसडीपीओ सा.ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनात पो नि प्रमोद बानबले, सहाय्यक पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, नापोका मुकेश गजबे, संदेश देवगडे, अजय कटाईत, निलेश तुमसरे यांनी केलेली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये