Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना उबाठा पक्षाच्या विधानसभा आढावा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह मान्यवरांनी घेतल्या  पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्थानिक श्री मंगल कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर  जाधव  यांच्या आदेशान्वये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विधानसभा आढावा सभा दि. १९ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारला आयोजित करण्यात आली. या सभेत मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह सभेतील इतर मान्यवरांनी  वरोरा, राजूरा, ब्रम्हपूरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील पुरूष व महिला  पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतीतून आगामी विधानसभा निवडणूकीचा आढावा घेतला.

     या सभेत प्रमुख मार्गदर्शिका मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे,  संपर्क संघटिका सोनाली म्हात्रे, पक्षाच्या निरीक्षक शालिनी सावंत आणि निधी  शिंदे तसेच  नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनी भावे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम,जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे ( वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र ) ,युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य (  गोडवाना विद्यापीठ गडचिरोली ) प्रा. निलेश बेलखेडे आणि शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू  प्रामुख्याने उपस्थित होते.

       याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, पुर्व विदर्भ युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य (  गोडवाना विद्यापीठ गडचिरोली ) प्रा. निलेश बेलखेडे व महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन  गायत्री यामलावार यांनी केले.

     याप्रसंगी  महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, सुषमाताई शिंदे,उपजिल्हा संघटिका  माया नारळे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने,भद्रावती  तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे,भद्रावती तालुका संघटिका आशा ताजने, वरोरा तालुका संघटिका सरला मालोकर,  युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे,भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, विठ्ठल हनवते, भद्रावती कृ. उ. बा. समितीच्या उपसभापती आश्लेषा जीवतोडे भोयर, वरोरा कृ. उ. बा. समितीच्या संचालिका कल्पना टोंगे,भद्रावती शहर सघंटीका माया टेकाम,वरोरा शहर सघंटीका शुभांगी  अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक भावना  खोब्रागडे, वर्षा ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने यांच्यासह फार मोठया संख्येत  शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बंधू -भगिनी उपस्थित होते.

रवींद्र शिंदे ही लोकांची काळजी घेणारी व्यक्ती, त्यांना साथ द्या : किशोरी पेंडणेकर

 पुरुष प्रधान संस्कृतीत महिला शक्तीमान आहे. आपण सर्व महिलांनी सर्व नातीगोती सांभाळून शिवसेनेच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजर राहून आपल्या  महाराष्ट्राबद्दल आणि शिवसेनेबद्दल प्रेम प्रगट केले.कोरोना सारख्या जागतिक संकटातील लॉकडाऊन मध्ये महिलांनी सर्वाधिक मदत दिली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला प्रत्येक जातीधर्मातील लोकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली.पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत काम करतांना आम्हाला

एक वेगळी वैचारीक पातळी आत्मसात करता आली. त्यामुळे आम्ही  अठरा वर्षातील कार्यकर्त्याप्रमाने नव्या उमेदीने कार्य करीत आहोत.

 विधानसभा उमेदवारीचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते मंडळी घेतील. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला पाहीजे.आपल्या पक्षाचे निशानी चिन्ह मशाल घरोघरी पोहचवा. असे प्रतिपादन  करतांना किशोरी पेंडणेकर पुढे म्हणाल्या की, मी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांची कार्य करण्याची पध्दत तसेच कार्यकर्त्यांप्रति  त्यांचे प्रेम व आपूलकी बघता रवींद्र शिंदे ही लोकांची काळजी घेणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना साथ द्या. असे आवाहन  किशोरी पेंडणेकर  यांनी उपस्थितांना केले. तसेच विधानसभा निवडणूकीनंतर होणाऱ्या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मात्र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे संकेत सुध्दा त्यांनी उपस्थितांना दिले. सोबतच  युवा सेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे,खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत आणि आ. भास्कर जाधव यांच्या कार्याचा उल्लेख सुध्दा त्यांनी केला.

गरजवंताना औषधोपचारासाठी आर्थिक मदत

 याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजवंताना औषधोपचारासाठी जाहीर केलेली आर्थिक मदत कार्यक्रमाच्या प्रमुख  अतिथी किशोरी पेंडणेकर  यांच्या हस्ते गरजवंतांच्या कुटूंबियांना  देण्यात  आली.

माढेळी येथील अर्धांगवायू ग्रस्त गौतम कांबळे,कोसरसार येथील रामचंद्र कामटकर यांची  पत्नी सुमन कामटकर कर्करोग झाल्याने,  बोपापूर येथील नगाजी राऊत यांना कर्करोग झाल्याने आणि गोंडपिंपरी येथील अश्फाक शेख यांना सुद्धा कर्करोग आजार असल्याने औषधोपचारा साठी आर्थिक मदत देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये