Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अशोक डोईफोडे

        देऊळगाव राजा तालुक्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी आळी व येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येत आहे.यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट येणार असून या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याने शासनाने तात्काळ तालुक्यातील सोयाबीन पिकांवर हूमनी अळी व येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करावे.अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

    राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,देऊळगाव राजा तालुक्यात सोयाबीन पिकावर हूमनी आळी व येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून या विषाणूजन्य रोगामुळे उभे सोयाबीन पिवळे पडून सुखू लागले आहे. परिणामी सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.

शेतकरी उसनवारी करून,सावकाराकडून कर्ज घेऊन दुकानातून महाआघाडी औषधी आणून फवारणी करत आहे. तरी देखील या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे दाणे देखील बारीक पडले आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा खर्च लावून मोठ्या मेहनतीने उगवलेले सोयाबीन वाळताना पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन पिकावर केलेला उत्पन्नाचा खर्च आता कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

याकडे मात्र कृषी विभागाचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.त्यामुळे सोयाबीन पिकावरील हुमणी अळी व येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, रवींद्र इंगळे,सचिन कोल्हे, जना मगर,निलेश शिंदे, सोनू बिल्डर, संतोष शिंगणे, अजबराव मुंडे, संतोष जाधव आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये