ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन वर तत्काळ तिकीट रिझर्वेशन सुरू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी येथील रेल्वे स्टेशन मध्ये तत्काळ तिकीट काढण्याची सुविधा नसल्याने येथील प्रवाशांना नगाभिड किव्हा वडसा येथे जावे लागत असल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळनार आहे.

 दि.१७ सप्टेंबर रोजी खासदार डॉ नामदेवराव किरसान यांची भेट घेऊन ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन वर तात्काळ रिझर्व्हेशन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनातून पुढे म्हटले आहे की,मागील अनेक वर्षी पासून फक्त जनरल रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा होती.

   ब्रम्हपुरी तालुक्यातील व ग्रामीण भागातील अनेक मुल आणि मुली विद्यार्थी आणि पालकांना वेळोवेळी भोपाळ, जबलपूर,रायपुर,पुणे,मुंबई, नाशिक शहर व दिल्ली येथे शिक्षण घेत आहेत तसेच अनेक नागरीक देव दर्शनासाठी व इतर काही महत्त्वाच्या कामासाठी नागपूर,गोंदिया व चंद्रपूर येथून रेल्वे पकडून पुढील प्रवास करताना नागरिक व विद्यार्थ्यांना अतोनात हाल नव्हे त्रास सहन करावा लागत आहे.

परंतु सामान्य जनतेला कोणत्या कामासाठी तत्काळ मध्ये रेल्वे ची तिकीट काढण्याची व बुक करायची असेल तर ब्रम्हपुरी वासियांना १६ किमी वडसा देसाईगंज व २० किमी अंतरावर असलेल्या नागभिड येथे जावे लागत असल्याने तसेच रिझर्व्हेशन ची वेळ ही सकाळी दहा वाजल्यापासून असल्याने व तत्काळ रिझर्व्हेशन करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने गरजूंना तिकीट खिडकीवर क्रमांक लवकर लागावा व रिझर्व्हेशन कन्फर्म तिकीट लवकर मिळावे यासाठी सकाळी सहा ते सात वाजताच ब्रम्हपुरी येथून जाऊन हजर व्हावे लागते यासाठी सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याने हा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यासमंधाने निवेदन खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांना यावेळी करण्यात आली.

निवेदन देते वेळी ब्रम्हपुरी येथील नागरिकांचे वतीने न.प.चे माजी नगर सेवक प्रितीस गजाननराव बुरले,निनाद गडे ,मनीष अलोने व इतर उपस्तीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये