Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जालना येथील पाच सायकल वीर वैष्णव देवी कडे रवाना 

श्री गोलेश्वर ग्रुप चे वतीने गेल्या 35 वर्षांपासून मातांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना देण्यात येत आहे प्रोत्साहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

18 दिवसात करणार 2300 किलोमीटर अंतराचा टप्पा पार

 महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब जम्मू कश्मीर राज्यातून जाणार सायकल वीर

जालना येथील गोलेश्वर ग्रुपच्या वतीने गेल्या 35 वर्षापासून अनेक भाविक सायकलने वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जात असतात दिनांक 19 सप्टेंबर 24 रोजी जालना शहरातील पाच भाविक भूषण विजय सेनानी, युवराज राजपूत, अर्जुन फतेलष्करी,उदय उपासे ,अक्षय राठोड, हे जम्मू कश्मीर मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले मा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत देऊळगावराजा शहरातील आमना नदीवर या पाच भाविकांचा सन्मान जालना बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष राहुल करनाडे यांच्या हस्ते व शहरातील प्रसिद्ध व्यापारी दीपक मल्लावत जायंटस वेलफेअर फाऊंडेशनचे सन्मती जैन, जुगलकिशोर हरकुट यांच्या वतीने करण्यात आला .जालना ते वैष्णोदेवी हे अंतर 2300 किलोमीटर असून हे सायकल वीर अठरा दिवसात पूर्ण करणार आहेत.

दिनांक सात ऑक्टोबर रोजी वैष्णोदेवी ला पोहोचणार आहेत ते भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,दिल्ली, पंजाब, जम्मू कश्मीर, या राज्यातून त्यांचा प्रवास पूर्ण करणार आहेत या भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी यावेळी अनेक भक्तगण उपस्थित होते यामध्ये मोहनलाल फतेलष्करी, गणेश भुरेवाल, राहुल भगत, शुभम भुरेवाल,किशोर फतेलष्करी, संतोष राजपूत,उपस्थित होते हे भाविक दररोज शंभर ते 120 किलोमीटर सायकल चालावणार आहेत येताना हे सर्व भाविक रेल्वेने परत येणार आहेत त्यांच्या या मार्गातील व्यवस्थेसाठी त्यांचे मित्र मंडळ त्यांना पूर्ण सहकार्य करीत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी व निरोगी आऊष्य जगण्यासाठी आम्हीं नेहमीच सायकल चालवितो असे या भक्तांनी सांगून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज किमान पाच ते दहा किलोमीटर सायकल चालवावी, असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये