ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथे ईद ए मिलाद कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जन्म दिवसाचे औचित्य साधून ईद ए मिला द रॅली काढून साजरी करण्यात आली. रजा सुन्नी जामा मस्जिद येथून रॅली काढून गावातील मुख्य रस्त्यावरून जात असताना कुंभार मोहल्ला येथे रॅलीत सहभागी असणाऱ्यांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले.

यामुळे हिंदू- मुस्लिम भाईचारा दिसून आला. पैगंबर मोह मद यांच्या शिकवणीतून शांती, भाईचरा,प्रार्थना, आणि सत्य या आधारावर सर्वांनी चालावे. असे चित्र निर्माण करून रॅलीची सांगता जामा मस्जिद येथे करण्यात आली यावेळी लहान मुलांकडून पठण कार्यक्रम संपन्न झाला असल्याने नाष्टा पाणी शरबत देऊन ईद ए मिला द उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये