ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तलवार बंदूक कोयत्यासहित गडचांदूर पोलिसांनी केली एकाला अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रविकुमार बंडीवार

नांदा फाटा : गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडचांदूर परिसरातील बंगाली कॅम्प लोडर कॉलनी परिसरात अभिषेक शत्रुघन सिंह वय 22 वर्ष यांचेकडे तलवार बंदूक आणि कोयता अशा प्रकारचे शस्त्र असल्याबाबतची माहिती मिळतात कदम यांनी सापळा रचून आपल्या ताफ्या सहित सदर इसमाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

दरम्यान, त्याच्या घरातून एक तलवार एक बंदूक व एक कोयता अशा प्रकारचे शस्त्र हस्तगत केले व त्याचे विरुद्ध अपराध क्रमांक 286 /2024 भारतीय हत्यार कायदा अन्वये कलम तीन चार व 25 अन्वे गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली सदर कारवाई मध्ये पोलीस हवालदार शितल बोरकर,सुभाष तिवारी,संदीप थेरे, तिरुपती माने महेश चव्हाण, रामसिंग पवार यांचा समावेश असून गडचांदूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये