ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर महिला तहसीलदारांनी पकडले

दंडात्मक कारवाई साठी पोलीस ठाण्यात जमा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दोन्ही महिला अधिकाऱ्यांचा कारवाईचा धडाका सुरूच

देऊळगाव राजा येथील महसुलच्या दोन्ही महीला अधिकाऱ्याकडून धडाकेबाज कारवाई सुरूच असल्याने रेती माफियाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत,शुक्रवारी रात्री अवैधरित्या विनापरवाना रेतीचे चार बास वाहतूक करणारे टिप्पर पकडून कारवाईसाठी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा च्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व नायब तहसीलदार डॉ.  आस्मा मुजावर यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी की काल रात्री अवैध रेतीची चोरीछुपे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळतात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ अस्मा मुजावर यांनी सापळा रचून एम एच 42 टी 15 78 या क्रमांकाचे टिप्पर अवैध रित्या रेती वाहतूक करताना बोराखेडी जवळ रंगेहात पकडले.

या टिप्पर चा मालक देऊळगावराजा येथील दीपक परमेश्वर जाधव असल्याचे चालक लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितले सदर टिप्पर पकडून दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले आहे यावेळी सदर कारवाई मध्ये चालक चव्हाण, शेरे आदी महसूलचे कर्मचारी सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये