ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. भाऊराव पाटील चटप प्राथ/माध्यमिक तथा स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरपणा येथे जनजाती गौरव दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

19 सप्टेंबर रोज शुक्रवारला अनुदानित आश्रम शाळा कोरपना येथे जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेपासून वीर बापूराव शेडमाके यांच्या स्मारकापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये विविध क्रांतीकारांची प्रतिकृती वेशभूषा साकारली. आदिवासी नृत्य, वाद्य संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले होते. जनजाती गौरव दिन या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य  बी.जी. खडसे सर होते. तर प्रमुख पाहुणे  मनोज तुमराम सर यांनी आदिवासींच्या क्रांतीकाराविषयी सकोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.श्री. वाघोजी गेडाम यांनी आदिवासी समाजाबद्दल सामाजिक सांस्कृतिक तथा आदिवासी क्रांतिकारकाने इंग्रजा विरुद्ध लढा कशा पद्धतीने दिला व आपल्या देशाला आदिवासी क्रांतीकरांचे योगदान कसे आहे.

 याविषयी आपल्या भाषणातून सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर श्री. शंकर सिडाम यांनी कोलामी व गोंडी भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले, श्री चायकाटे माजी सरपंच रूपापेठ यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून संवाद साधला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी अध्यक्षीय भाषणातून आदिवासी क्रांतिकारकांची प्रेरणा घेऊन शिक्षणाची कास धरावी व आदर्श समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे ध्येय गाठून समाज विकासाला योगदान द्यावे असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये आदिवासी मुलांचे,/मुलींचे वस्तीगृह गृहपाल, तथा स्कॉलर सर्च अकॅडमी कोरपना येथील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपलांचीवार सर यांनी केले. व प्रास्ताविक गेडाम सर यांनी केले.

तर आभार प्रदर्शन जाधव सर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. डी.एम अडकिने सर. वस्तीगृह अधीक्षक /अधीक्षिका, सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राज्य गीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये