वाहन चालक दिन उत्साहात संपन्न
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वाहन चालक दिनाचे औचित्य साधून अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रुग्णाला फळें वाटप आणि ट्रान्सपोर्ट नगर अम्बुजा फाटा येथे वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर आणि वाहन चालक यांचा सत्कार करून वाहन चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, दुर्गापूर शाखा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे डॉ. गेडाम यांच्या उपस्थितीत रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
दरम्यान शासकीय कामानिमित्त फेरफटका मारायला आलेले चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन निरिक्षक संजय सर यांनी वाहन चालक दिनाचे औचित्य साधून अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, जिल्हा अध्यक्ष अनंताभाऊ रामटेके आणि सुरेश वाघमारे यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
ट्रान्सपोर्ट नगर येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे आणि चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रान्सपोर्ट नगर अम्बुजा फाटा येथे वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे पर्यवेक्षक वसंतभाऊ माणूसमारे, पंकजभाऊ बोंडे, महादेवभाऊ वाघमारे, राजकुमार धुळे, हनुमान मस्कले, देविदासभाऊ कांबळे, योगेशभाऊ लालसरे, प्रफुल्लभाऊ गावंडे, अविनाश बोरूले, यासीर शेख, सिद्धार्थ नरवाडे, राकेश आदे, योगेश आत्राम, सिद्धार्थ वाघमारे इत्यादी सुपरवायझरचा सत्कार करून येथील वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला.