ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडास्पर्धेत देऊळगाव राजा येथील मुलाची चमकदार कामगिरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडास्पर्धेत देऊळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत शालेय विभागीय तायक्वांदो क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत राजेश खांडेभराड सर यांच्या मार्गदर्शनात स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीचे विद्यार्थी

 मैथिली तायडे, स्वरूपा खांडेभराड ,मयुरी थेटे,हरिओम रामाने यांनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्तरासाठी आपली जागा निश्चित केली आहे तर निलेश शिवरकर, राघव झोरे, अरुण शिवरकर, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सिल्व्हर मेडल घेऊन यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे देऊळगाव राजाचे नाव जिल्हास्तरावर झळकले असून परिसरातून या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून पुढील विभागीय स्पर्धेत देखील विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये