नवसाला पावणारी देवी म्हणून परिचित असलेली जय महाराष्ट्र दुर्गा उत्सव मंडळाची देवी
39 वर्षाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी साजरा होणार श्री दुर्गा उत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत देऊळगाव राजा येथे 1987 मध्ये सार्वजनिक दुर्गा उत्सवास सुरुवात झाली व सर्वप्रथम नगरपरिषद सार्वजनिक वाचनायला समोर जय महाराष्ट्र दुर्गा उत्सव मंडळाने देवीची स्थापना केली त्यावर्षीपासून अखंडितपणे या मंडळाने दरवर्षी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे या देवीचे वैशिष्ट्य असे की ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून शहरासह पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली आहे अनेक देवी भक्तांनी या देवीसमोर प्रगट केलेली इच्छा आतापर्यंत पूर्ण झाल्याचा अनेक देवी भक्तांना अनुभव आलेला आहे यावर्षी सुद्धा मोठ्या भक्ती भावाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यावर्षी सुद्धा या मंडळांनी नवरात्र उत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण केली असून यावर्षी या मंडळाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध विधीज्ञ जगदीश मिनासे यांची निवड केली आहे तर इतर कार्यकारिणी सुद्धा जाहीर केली आहे.
उपाध्यक्षपदी संतोष दायमा सचिव जगदीश कापसे, कोषाध्यक्ष वसंत अप्पा खुळे,सदस्यपदी गोविंदराव झोरे,दीपक बोरकर, पत्रकार सन्मती जैन, बळीराम मापारी, मधुकर रायमूल,दीपक पिंपळे, मोहन खांडेभराड,संकेत पिंपळे, गजानन गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे देवीची स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची याची माहिती या मंडळाचे प्रमुख माजी नगरसेवक वसंतआप्पा खुळे यांनी दिली आहे. 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत या मंडळाने नवा इतिहास निर्माण केला आहे.