ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षणाकडे वाटचाल करावी

श्री.दारासिंग राजपूत पोलीस निरीक्षक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

स्व.भाऊराव पाटील चटप प्राथमिक/माध्यमिक तथा स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथे पोस्को, कायदा अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

दिनांक:-10/10/2024 रोज गुरुवारला करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य . बी जी खडसे सर, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कोरपणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. डी. राजपूत साहेब पोलीस निरीक्षक यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी महान व्यक्तिमत्व, यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे वाटचाल करावी विद्यार्थ्यांनी धेर्य गाढण्यासाठी परीक्षम करावे लागते परीक्षमा शिवार यशस्वी होत नाही त्यसाठी धैर्य निश्चित करून वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी जी खडसे सर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्या येत असतील तर प्रथम शिक्षकांना संकोच व भीती न बाळगतां सांगावे, तसेच दर्शनी भागावर लावलेल्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा. असे याप्रसंगी आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. गेडाम सर यांनी केले. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी . एम, आडकिने सर, पदवीधर शिक्षिका, कु धूपे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रासेकर सर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वी साठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये