ताज्या घडामोडी

ट्रॅव्हल चालक मारहाण प्रकरणी ठाणेदाराला वाचविण्या साठी पोलीस विभागाची सारवा सावर

पोलीस हवालदारच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल चालका विरोधात गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट: नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी : परिवारासह खासगी गाडीत सिव्हील ड्रेस वर असताना हात दाखून सुद्धा ट्रॅव्हल थांबवली नाही हा राग धरून ब्रम्हपुरी ठाणेदार यांनी ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौक येथे ट्रॅव्हल थांबउन शिवीगाळ करत आधी मारहाण केली मग पोलीस दांड्याने डोक्यावर वार करून रक्तबंबाळ केले तसेच एव्हढ्यावरच न थांबता रक्त बांबळ अवस्थेतच ट्रॅव्हल चालवत ठाण्यात लावायला सांगितल. ब्रम्हपुरी पोलीसानी ठानेदारांचे विरोधातील तक्रारच घेतली नाही म्हणून ट्रॅव्हल चालकाने दिनाक 26 ला उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे तक्रार दाखल केली आहे .आता घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिनाक 27 ला सदर प्रकरणात पोलीस हवालदार पठाण यांचे तक्रारीवरून ट्रॅव्हल चालकाचे विरोधात विविध कलम अंटर्गत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर ला ख्रिस्तानंद चौक, ब्रम्हपुरी येथे कर्तव्यावर हजर असतांना सुमारे 4 वा. चे दरम्यान प्रवाशांनी सांगीतले की, राष्ट्रीय महामार्ग क्र 353 ड वरील रेल्वे गेट, वर वाहतुक जाम झालेली आहे. अशा माहीती वरून आम्ही तात्काळ ठाणेदार श्री अंभोरे, पोउपनि प्रशांत खोब्रागडे, पोउपनि जुनोनकर, पोहवा शिवनकर, पोशि देवगडे, पोशि सावसाकडे, यांना फोनद्वारे बोलावले. वरील अधिकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सह रेल्वे गेटवर वाहतुक नियंत्रण करीत असतांना आरमोरी कडुन ब्रम्हपुरी कडे एक ट्रॅव्हल्स क्र MH/49/AT/3625 चा चालक हा आपले ताब्यातील ट्रॅव्हल इतर वाहनाना ओव्हर टेक करून झिक झ्याक पध्दतीने व भरधाव वेगाने चालवुन स्वत:च्या व लोकांचे जिवीतास धोका निर्मान होईल अशा स्थितीत मिळून आला. त्यास आम्ही वाहन थांबविण्यास सांगीतले असता त्याने ट्रव्हल रेल्वे गेटवर न थांबविता त्यांने ख्रिस्तानंद चौक, ब्रम्हपुरी येथे अचानक जोराने ब्रेक मारून रोडवर ट्रॅव्हल्स थांबविली. त्यास हाताचा इशारा करू रोडच्या बाजुला गाडी थांबवीली. त्यास गाडीच्या खाली उतरण्यास सांगीतले असता तो जख्मी अवस्थेत खाली उतरला व आमचे व ठाणेदार साहेबांसोबत वाद करायला लागला अशी पोलीस हवालदार फिरोजखाँ पठाण यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल चालक मोहन अडीकवार यांचे विरोधात कलम 279,336,337 भादवि सहकलम 184 मोवाका अन्वये ब्रम्हपुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेत ब्रम्हपुरी पोलिसांनी ठाणेदारचे विरोधातील ट्रॅव्हल चालकाची दिनाक 26 ला 4 वाजता घडलेल्या घटनेची तक्रार घेतली नाही म्हणून ट्रॅव्हल चालकाने ठाणेदारचे विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे तक्रार दाखल केली असताना आता दिनाक 27 ला पोलीस हवालदार पठाण यांचे तक्रारीवरून ट्रॅव्हल चालकावरच विविध कलम लाऊन ब्रम्हपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आता लोकांमध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.सदर प्रकारात जिल्हा पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये