ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोपाल शिरपूरकर यांच्या ‘भुईकोर’ कथासंग्रहाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : आपल्या कसदार लेखणीने ग्रामीण जीवनातील मातीचा गंध साहित्यात उतरवणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वडगाव येथील लेखक, कवी गोपाल शिरपूरकर यांच्या ‘भुईकोर’ या बहुचर्चित कथासंग्रहाने एकाच वेळी दोन प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत ‘भुईकोर’ या कथासंग्रहास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार २६ एप्रिल रोजी साताऱ्यात प्रदान केला जाणार आहे. याचसोबत, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’चा राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रहाचा तृतीय पुरस्कारही शिरपूरकर यांनाच जाहीर झाला असून, हा सोहळा २५ एप्रिल रोजी गारगोटी, कोल्हापूर येथे पार पडणार आहे.

एकाच वेळी पश्चिम महाराष्ट्रातील दोन मातब्बर साहित्य संस्थांनी शिरपूरकर यांच्या कलाकृतीची दखल घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये