वासवी कन्यका परमेश्वरी जयंतीनिमित्त भव्य पालखीचे जटपुरा गेटवर स्वागत
भाजपच्या वतीने भाविकांना शीतपेय वितरण

चांदा ब्लास्ट
श्री माता वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या ८९ व्या प्राणप्रतिष्ठापना दिन व जयंती महोत्सवानिमित्त श्री माता कन्यका परमेश्वरी मंदिर येथून निघालेल्या भव्य पालखी व शोभायात्रेचे जटपुरा गेट येथे भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या वतीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या भाविक भक्तांना शीतपेयांचे वितरण करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, वंदना हातगावकर, नगरसेविका अॅड. सारिका संदुरकर, मिनिंद गंपावार, प्रितम बोनगिरवार, पुनम तिवारी, रामकुमार आकापल्लीवार, रंजन ठाकूर, आकाश पडगीलवार, ईश्वर वाघमारे, विक्रांत समुद्रालवार, अमोल नालमवार, संजय कोत्तावार, आदी उपस्थित होते. या शोभायात्रेमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.



