ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सेलू पोलीसांनी प्रो रेट करून 84 हजाराचा दारूचा मुद्देमाल केला नष्ट.

पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि 21/06/2026 रोजी मुखबीरचे गोपनीय माहीती वरून मौजा हिंगणी शेत शिवारातील वझूरकर यांचे शेतालगत असलेल्या नाल्याजवळ सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे व पोलीस कर्मचारी यांनी मोहा रसायण सडवा बाळगून असल्या बाबतची माहिती वरुन तिथे प्रोरेड करून कार्यवाही करण्यात आली असताना हिंगणी येथे राहणारा साहेबराव जुवारे याला पोलीस आल्याची चाहूल लागताच मोक्यावरून पसार झाला. मौक्यावरून गाळणे करिता लागणारा कच्चा मोहा सडवा एकून 400 लि, व लोखंडी ड्रम एकून कि 84000/-रू किमतीचा मुद्देमाल मिळाल्याने जागीच जप्त/नष्ट करून, हिंगणी येथे राहणारा साहेबराव जुवारे याचे विरूद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वे गून्हा नोंद करण्यात आला आहे. रोजच्या कारवाई मुळे सेलू परिसरातील दारू विक्रेत्यांच्या मनामध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल वर्धा,अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनातून पोलीस स्टेशन सेलू चे नवनियुक्त ठाणेदार पंकज वाघोडे व हिंगणी बिटचे जमादार शरद इंगोले गंगाधर तांबारे यांनी केली आहे. फरार आरोपी साहेबराव जुवारे याचा शोध घेणे सूरू आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये