ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. रासेयो सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पतंजली योग समितीच्या सौ. वैजयंती विकास गहुकर यांनी योग विषयक प्रात्यक्षिके सादर करून विविध आजारांवर योगाच्या माध्यमातून कशी मात करावी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. सेवानिवृत्त कर्मचारी लाड, गटनिदेशक हितेश नंदेश्वर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविकपर भाषण रासेयो सल्लागार बंडोपंत बोढेकर यांनी केले.

यावेळी एएस आय विकास गहूकर, कार्यक्रम अधिकारी राजु श्रीरामे, सहकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन पियुष केने यांनी केले तर आभार प्रदर्शन एन. टी. गराड यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन निदेशक सुतार, अनिता ढेंगेकर, राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घटे, गराड, धुळसे, मारबते, चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये