ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, वर्धा येथे एनसीसी कॅडेट्सकरिता सायबर जनजागृती व मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, वर्धा येथे एनसीसी युनिटतर्फे आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-605) दरम्यान सायबर पोलीस स्टेशन, वर्धा यांच्या वतीने सायबर गुन्हे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथील पोलीस हवालदार दिनेश बोथकर व पोलीस अंमलदार अंकित जिभे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभाग नोंदविला. त्यांनी उपस्थित एनसीसी कॅडेट्सना सायबर सुरक्षेचे महत्त्व, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, बनावट कॉल व संदेश, ओटीपी फसवणूक, सोशल मीडिया खाते हॅकिंग, फेक लिंकद्वारे होणारी फसवणूक, मोबाईल गेम फसवणूक, सायबर बुलिंग तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची आवश्यक काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती देत त्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांवरही प्रकाश टाकण्यात आला. तसेच सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या कार्यक्रमास सुमारे ४३० एनसीसी कॅडेट्स व मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा, सोशल मीडिया, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल गोपनीयता यासंदर्भातील विविध प्रश्न विचारून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये