ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा पथकाकडुन देहव्यापार करणाऱ्या आरोपीतांनवर रेड

पिडीतेची सुटका करुन आरोपीतांचे ताब्यातुन ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २०/०६/२०२६ रोजी अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कश्व, वर्धा चे पथक कार्यालयात हजर असतांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, “मुस्कान उर्फ शबनम नावाची महीला रा. सांवगी (मेघे), वर्षा ही स्वतःचे आर्थीक फायदया करीता राज्यातील व परराज्यातील वेगवेगळ्या मुलींना पैशाचे आमीष देवून देहव्यापारास प्रवृत्त करून त्यांना कृष्णाई कोर्ट बिल्डींग सावंगी (मेघे) टिपॉईंट, वर्धा येथील फ्लॅटवर बोलावुन ग्राहकांसोबत संपर्क करुन त्यांना मुली पुरवुन देहव्यापार करून घेते.” अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण बनावटी ग्राहक (पंटर) तयार करुन रेड कार्यवाही दरम्याण दिलेल्या सुचना प्रमाणे त्याने दिलेल्या ईशाऱ्या वरुन अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा चे पथका मार्फत सावंगी (मेघे) टिपॉईट वर्धा परीसरातील कृष्णाई कोर्ट बिल्डींग चे तिसरे माळयावरील फ्लॅट क्रमांक १३ वर रेड केला असता सदर फ्लॅट मध्ये आरोपी नामे राजु उर्फे निलेश प्रदीपराव आदेवार, वय २१ वर्षे, रा. तुकाराम वार्ड, रामनगर, वर्धा हा मिळुन आला सदर फ्लॅट चे झडतीत एका रुम मध्ये बनावटी ग्राहक व एक पिडीत महीला देहव्यापार करीत असतांना मिळुन आले. सदर पिडीत महीला हीला विचारपुस केली असता ती बाहेर राज्यातील असल्याचे सांगुन तिला मुस्कान उर्फे शबनम नावाची महीला रा. सांवगी (मेघे), वर्धा हीने देहव्यापारा करीता पैशाची आमीश देवुन बोलाविले असल्याचे सांगीतले. तसेच सदर आरोपी महीलेने ग्राहकांकडुन पैसे घेण्या करीता व त्या जागेची देखरेख करणे करीता आरोपी नामे राजु उर्फे निलेश प्रदीपराव आदेवार, वय २१ वर्षे, रा. तुकाराम वार्ड, रामनगर, वर्धा यास ठेवलेले असल्याचे दिसुन आले. आरोपीतांचे ताब्यातुन तिन अॅन्ड्राईड मोबाईल, नगदी ८,०००/-रु, देहव्यापारा करीता लागणारे साहीत्य असा एकुण जु. किंमत ३८,०००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), वर्धा येथे कलम १४३(२) भारतीय न्याय सहीता २०२३ सह कलम ३, ४, ५, ७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ प्रमाणे गुन्हा नोंद करुन पिडीत महीला हीला महीला सुधार गृह, वर्धा येथे दाखल करण्यात आले असुन महीला आरोपी नामे मुस्कान उर्फे शबनम नावाची महीला रा. सांवगी (मेघे), वर्धा हीचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहा पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सुर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख सर्व नेमणूक अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये