सेलू पोलीस ठाणेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20/06/2026 रोजी मुखबिरचे गोपनीय माहीती वरुन बोरी कोकाटे शिवारातील बोर नदी काठावर सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे व त्यांचा पोलीस स्टाफ यांनी वॉश आऊट मोहीम दरम्यान गावठी मोहा दारू ची रनींग हातभट्टी सुरु असल्या बाबतच्या माहिती वरुन तिथे रेड कार्यवाही केली असता हिंगणी येथे राहणारा पंढरी जुगनाके हा पोलीस आल्याची चाहुल लागताच मोक्यावरुन पसार झाला, तसेच त्याचा सोबती आशिष उपास ठाकरे हा मोक्यावर मिळुन आला. त्याचे ताब्यातुन मोक्यावरुन गाळणे करिता लागणारा कच्चा मोहा सडवा एकुण 1800 लिटर तसेच जमिनीत गाडून असलेल्या डूम मध्ये 2400 लिटर कच्चा मोहा सडवा, 800 लिटर उकळता मोहा सडवा, 260 लिटर गावठी मोहा दारू, लोखंडी ड्रम व इतर भट्टी साहित्य असा एकूण किंमत 11,48,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाल्याने जागीच जप्त नष्ट करुन, हिंगणी येथे राहणारे पंढरी जुगनाके व त्याचा सोबती आशिष उपास ठाकरे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रोजच्या कारवाई मुळे सेलू परिसरातील दारू विक्रेत्यांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सेलू चे नवनियुक्त ठाणेदार पंकज वाघोडे व हिंगणी बीटचे जमादार प्रशांत श्रीवास्तव तसेच सेलू डीबी पथकाचे मनोहर मुडे अखिलेश गव्हाणे, सचिन वाडखेडे व विनायक गोडे यांनी केली आहे. सदर कार्यवाही दरम्यान गोहदा गावचे पोलीस पाटील राजकुमार भलावी यांनी मोलाची मदत केली असून फरार आरोपी पंडरी जुगनाके याचा शोध घेणे सुरू आहे.



