ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ मयुर बुरांडे यांना जाहीर

२ ऑक्टोंबरला विद्यापीठात होणार सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार’ आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थी मयुर बुरांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विद्यापीठाने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. अतुल वैद्य लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर, श्री. अविशांत पांडा मा. जिल्हाधिकारी गडचिरोली, डॉ. श्रीराम कांवळे प्र-कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तसेच या कार्यक्रमांमध्ये आधिसभा व्यवस्थापन, व्यवस्थापन परिषद, विद्यासभा परिषद यांचे सन्माननीय सदस्यांनी विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे/मंडळाचे/ समित्यांचे सदस्य तसेच अन्य मान्यवर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या सर्वांच्या उपस्थिती मध्ये मयुर बुरांडे यांना त्यांच्या सर्वांच्या वतीने गौरविण्यात येणार आहेत.

मयुर बुरांडे यांनी महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक व विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची विद्यापीठाने दखल घेत उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी निवड केली आहे.

या पुरस्कारामुळे आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मयुर बुरांडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये