ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी सहा नगर परिषद क्षेत्रात मद्यविक्री बंद

भद्रावती व ब्रह्मपुरी येथे 27 सप्टेंबरला आदेश लागू

चांदा ब्लास्ट

राजुरा, मूल, वरोरा व चिमूर येथे 26 सप्टेंबर

चंद्रपूर :_ सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा, चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या संबंधित दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, मूल, वरोरा व चिमूर तालुक्यात 26 सप्टेंबर रोजी, तर भद्रावती व ब्रह्मपुरी तालुक्यात 27 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संबंधित नगर परिषद हद्दीतील किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

आदेशानुसार 26 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस राजुरा, मूल, वरोरा आणि चिमूर नगर परिषद हद्दीतील, तर 27 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस भद्रावती आणि ब्रह्मपुरी नगर परिषद हद्दीतील एफएल-२, सीएल/एफएल/टीओडी-३, एफएलबीआर-२, एफएल-३ आणि सीएल-३ या किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील.

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचा अथवा नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये