ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक २१ जून रोजी पोंभुर्णा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपंचायत समोरील पटांगणात “जागतिक योग दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान कु. सुनीता ढूमणे (एम.ए. योगशास्त्र) तसेच योगगुरू मा. दिलीप मॅकलवार यांचा योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे सांगून प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

पंतप्रधान Narendra Modi यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक स्तरावर विशेष मान्यता मिळाली असून आज संपूर्ण जग २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा करीत असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष हरिष ढवस यांनी उपस्थितांचे आभार मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये