ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती माफीया विरूध्द देवळी पोलीसांची धडाकेबाज कार्यवाही 8 लाख 7 हजाराचा मुददेमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभकुमार अग्रवाल सा, (भापोसे) मा.अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे सा, उपविभागीय पोलीस अधीकारी, डॉ. वंदना कारखेले. उप विभाग पुलगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन देवळी ठाणेदार संदीप कापडे, व पोलीस स्टेशनचे अंमलदार पोहवा. गणेश बावणे ब.नं. 609, पोशी. पंकज चामचोर ब.नं. 367, पोशी. अनिकेत तळवेकर ब.नं. 364 यांनी दिनांक 21.06.2026 चे 05.20 वा ते 05.50 वाजता दरम्यान गोपणीय माहीती काढुन मौजा वायगाव शिवारारातील सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर नाकेबंदी करून अवैध रेती (गौण खनीज) ची अवैद्य चोरटी वाहतुक करणा-यावर धाडी टाकुन आरोपी 1) गौरव अशोकराव गोडे वय 30 वर्ष रा. शिरसगाव ता. देवळी जि. वर्धा (अटक), 2) प्रज्वल कवडुजी कोहळे वय 21 वर्ष रा. सोनेगाव बाई ता. देवळी जि. वर्धा (अटक) यांचे ताब्यातुन जुमला किंमत 8,07,000 /- रूपये चा मुददेमाल. विनापास परवाना, शासनाचा महसुल बुडवून साठवनुकी करीता वाहतुक करीत असंताना मिळुन आले. आरोपीतांविरूध्द अप. कंमाक 444/26 कलम 303(2), 3(5) बी.एनएस 48(8), महाराष्ट्र जमीन महसुल संहीता सहकलम सहकलम 181, 130,177 मोवाका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा. गणेश बावणे ब.नं. 609 पोलीस स्टेशन देवळी हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये