ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिल्ली शंखनाद पेन्शन रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

'एकच मिशन जुनी पेन्शन'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

        दि. ०१ ऑक्टोबर २०२३ला दिल्ली येथे रामलीला मैदानावर होणाऱ्या देशव्यापी पेन्शन शंखनाद रॅलीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून बहुसंख्येने पेन्शन शिलेदार उपस्थित राहावे यासाठी जिल्हा व तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांनी जाणीव जागृती करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष विपीन धाबेकर यांनी केले.

`महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांची जिल्हा सभा बैठक ज्येष्ठ नागरिक हाल चंद्रपूर येथे संपन्न झाली.या बैठकीत श्री धाबेकर बोलत होते, इथून पुढे पेन्शन मिळेपर्यंत विविध आंदोलने करत पेन्शन चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या बैठकीत नवनियुक्त जिल्हा सचिव लखन साखरे, जिल्हा नेते दुशांत निमकर, प्रशांत खुसपुरे,निलेश कुमरे, राज्यप्रतिनिधी डॉ.गुलाब लाडे,मनीष वैरागडे,राकेश शेंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नवनियुक्त जिल्हा सचिव लखन साखरे म्हणाले,येणारे २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून निर्णायक वर्ष आहे. या वर्षात जिल्हा,राज्य व देश पातळीवर अनेक आंदोलने करावी लागणार आहेत. त्यासाठी प्रत्येक एन.पी.एस. धारकापर्यंत पोहचून जागृती करावी. व्होट फॉर ओपीएस मोहीम शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवावी.

सर्व तालुका अध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातील सर्व एन.पी.एस. धारक कर्मचारी यांची माहिती एकत्र करणे, सभासद नोंदणी अभियानवर भर देणे प्रत्येक तालुक्यामध्ये महिला कार्यकारणी सक्षमपणे उभी करावी. याकरिता सभेत मार्गदर्शन करण्यात आले.

या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सचिव व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व पेन्शन शिलेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये