देऊळगाव राजा तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे तीन- तेरा
शासनाचा लाखोचा खर्च व्यर्थ, आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे, बदलत्या हवामानामुळे रुग्णांना घ्यावा लागतो खाजगी दवाखान्याचा आधार?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
रुग्णांना निशुल्क सेवा मिळावी यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र, तसेच आपणा दवाखाना रुग्णांच्या सेवेसाठी शासनाने निर्मिती केलेली आहे, परंतु काही ठिकाणचा अपवाद वगळता वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या आरोग्य सेवा ग्रामीण भागात मिळणे दुरा पास्त झाल्याने. आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या पालनपोषणासाठी आहे की रुग्णांच्या सेवेसाठी अशा प्रकारचा यक्षप्रश्न सद्यस्थितीत तालुक्यात निर्माण झालेला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये रुग्णांना प्राथमिक उपचार तात्काळ मिळावा यासाठी संबंधित केंद्राची निर्मिती केलेली आहे.
परंतु वेळ काढू वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी रुग्णांना सेवा देण्यासाठी सपसेल अपयशी ठरत असल्याने शासन महिन्याकाठी वैद्यकीय, अधिकारी कर्मचारी, तसेच रुग्णसेवेसाठी लाखो रुपये खर्च करत परंतु रुग्ण सेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो सरकारी आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या सेवेसाठी आहे की स्व- हितासाठी याचे उत्तर मात्र अधिकाऱ्याकडे नाही. *अधिकारी कर्मचाऱ्यांवर लाखोचा खर्च परंतु सेवा निरंक* शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे, त्यांना साथ ही गाव पातळीवर नियुक्त अशा स्वयंसेविका यांची असते या कर्मचाऱ्यांकडे प्रामुख्याने गाव पातळीवरील पाण्याचे नमुने घेणे, लसीकरण, साथ रोगाचे निर्मूलन यासह स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा देणे ह्या प्रमुख सेवा असतात परंतु सदरील कर्मचारी निर्गमित वेळेत गाव पातळीवर फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे का* ग्राम पातळीवर नियुक्त कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे हे बंधनकारक आहे, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा ज्ञात असते, परंतु ग्राम पातळीवर ग्रामपंचायत चा दाखला घेऊन आणि मुख्यालय राहतो असे हे कर्मचारी भासवतात, संपूर्ण वास्तव ती पाहणी केली असता एकूण कर्मचाऱ्यापैकी तीन ते चार कर्मचारी वगळता एकही कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने यांचे घर भाडे आणि इतर खर्च कसा काढला जातो.वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मुख्यालयाची पडताळणी का करत नाही याकडे लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष घालावे असे मागणे जनतेतून होत आहे. *बहुतांश वैद्यकीय अधिकारी खाजगी चालवतात दवाखाना* शासनाचा गले लठ्ठ पगार असताना सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा खाजगी दवाखान्याचा मोह मात्र कमी होत नाही मिळालेल्या वेळेतून सदर अधिकारी कर्मचारी वेळ मिळेल तेव्हा नाममात्र सरकारी सेवा देत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य संघटने कडून टाकण्यात येतो दबाव* तालुक्यामध्ये आरोग्य सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राम पातळीवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात विचारणा केली असता संबंधित कर्मचारी काम न करता त्यांच्या आरोग्य संघटनेमार्फत त्यांच्यावर दबाव आणून आपले इच्छित कार्य तडीस नेतात, असल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही केल्यानंतरच ग्राम पातळीवर आरोग्य सेवा काही प्रमाणात सुरळीत होईल एवढे मात्र खरे? * *अशाप्रकारे आहे स्थिती तालुक्यातील आरोग्य केंद्रांची* तालुक्यामध्ये जवळखेड तसेच अंढेरा, या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आलेले आहे, त्यामध्ये जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण सात केंद्र आहेत त्यामध्ये असोला जहांगीर, बोराखेडी बावरा, गि रोली बुद्रुक , मेहुना राजा, सावखेड भोई, भिवगाव बुद्रुक, आणि सिनगाव जहांगीर, आणि अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण आठ उपकेंद्र आहेत यामध्ये अंढेरा, देऊळगाव मही, दिग्रस बुद्रुक, मंडप गाव, मेंडगाव, निमगाव गुरु, सावखेड नागरे, सरंबा, यासह आपला दवाखाना तुझ्या अंतर्गत संजय नगर माळीपुरा आणि त्रिंबक नगर ही केंद्रे कार्यरत आहे किमान उपकेंद्रातील कर्मचारी सुद्धा मुख्यालय राहत नसल्याचे वास्तव आज केलेल्या पाहणीत आढळून आले, *आरोग्य विभागात अशाप्रकारे आहे नियुक्त कर्मचारी* तालुक्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट अ- एकूण मंजूर पदे चार आहेत तर भरलेले तीन आहेत एक पद रिक्त आहेत, वैद्यकीय अधिकारी गट ब एक पद मंजूर भरलेले आहे, आरोग्य सहाय्यकांची एकूण पाच पदे आहेत ती भरलेली आहेत, आरोग्य सहाय्यक मंजूर एकूण चार पदे आहेत भरलेले तीन आहे तर एक पद रिक्त आहे, आरोग्य सेवकांची एकूण मंजूर 20 पदे आहेत भरलेली अठरा आहेत तर रिक्त दोन आहे, आरोग्य सेविका एकूण वीस पदे मंजूर आहेत पैकी 11 भरलेले आहेत नऊ पदे रिक्त आहे.
– आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी यांनी मुख्यालय राहावे यापूर्वी सुद्धा आदेश निर्गमित केलेले आहेत, ग्राम पातळीवर नियुक्त कर्मचाऱ्यांनी सुद्धा वेळेवर सेवा द्यावी यासाठी सुद्धा आदेशित केलेले या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन त्यांच्या संदर्भात कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येईल केंद्रामार्फत रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे. डॉ.सदानंद बडसोड – तालुका आरोग्य अधिकारी



