ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२५ हजारांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

गोंडपिपरी पोलिसांची यशस्वी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील फुरडी हेटी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमावर शनिवारी पहाटे पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत होला हुक्काचे एक किलोग्रामचे १४ सीलबंद पॉकेट, किंमत रुपये १८,८५० आणि ईगल तंबाखूचे ४०० ग्रामचे ८ पॉकेट, किंमत रुपये ६८००, असा एकूण २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संघराज केशव तेलसे ( ५० वर्षे, राह. फुरडी हेटी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार अनुप कवठेकर, अंमलदार सचिन झाडे, सुनील गव्हारे, पुणेश्वर कुलमेथे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये