ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

भद्रावतीत दि. २६ व २७ ला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन नगाजी नगर, भद्रावती येथे दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. दोन दिवसीय महोत्सवात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यतिथी महोत्सव समितीने केले आहे.

दि. २६ ऑक्टोबर २०२६, सोमवार सकाळी ६ वाजता श्री ची घटस्थापना, पूजा व आरती होईल. सकाळी ७ वाजता स्वच्छता अभियान, सकाळी १० ते १२ आरोग्य शिबीर, भव्य रोगनिदान व औषधोपचार, दुपारी १२ ते ५ महिला व मुलींकरीता विविध स्पर्धा, दुपारी १२ ते २ महिला संमेलन, दुपारी २ ते ४ आनंद मेळावा (पाककला), सायं. ४ ते ६ सामुदायिक प्रार्थना व विचार मंथन, सायं. ६ ते ७ पोथीचे पारायण, रात्री ७ ते १० भारुड (ग्रामगीताचार्य रवि पचारे महाराज) हा कार्यक्रम होणार आहे. तर दि. २७ ऑक्टोबर २०२६, मंगळवार ला सकाळी ६ ते ७ सामुदायिक ध्यान, सकाळी ७ ते ८ श्री चा अभिषेक, पूजा व आरती, सकाळी ८ ते ११ पालखी सोहळा व शोभायात्रा (नगाजी महाराज देवस्थान ते मेन रोड जुना बस स्टँड ते नग मंदिर ते परत नगाजी नगर परिसरात), दुपारी ११ ते २ जाहीर कीर्तन (गोपाळ काला) महाराष्ट्रातील युवा प्रेरणादायी व्याख्याती ह.भ.प. वैष्णवी अतकरे (आळंदीकर) यांचे होणार आहे.

दुपारी २ ते ४ सत्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सत्कारमुर्ती प्रफ्फुलभाऊ चटकी नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती, सौ. रेखाताई खुटेमाटे आरोग्य सभापती नगरपरिषद, देवेंद्रभाऊ गडपाले नगरसेवक भद्रावती व सुनिलभाऊ नामोजवार नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष भद्रावती यांचा होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव लांडगे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) गुरुनगर, भद्रावती हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून हंसराज भैय्या अहिर (राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष, भारत सरकार), करणभाऊ देवतळे (आमदार ७५-वरोरा-भद्रावती), मुकेशजी जिवतोडे (शिवसेना चंद्रपूर जिल्हा लोकसभा संघटक), शशिकांतभाऊ नक्षिणे महा. नाभिक महामंडळ (जिल्हाध्यक्ष यवतमाळ,) अहेतेश्याम अली (माजी नगराध्यक्ष, वरोरा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायं. ५ ते ९ महाप्रसाद व सायं. ६ ते ९ सुगम संगीत व आर्केस्ट्रा भक्तीगीते, भावगीते कार्यक्रम आहे. या महोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र हनुमंते, कार्याध्यक्ष हरीश शे. घुमे, सचिव सचिन प्र. नक्षिणे, उपाध्यक्ष सुरेशराव जमदाडे, सतिश मांडवकर, कोषाध्यक्ष पांडुरंग हनुमंते, सुधिर लांडगे, सहसचिव जितेंद्र नागतुरे, सागर घुमे आहेत. समस्त नाभिक समाज बांधव, भद्रावती यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये