ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती अज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापिका सौ माधुरी मस्की मॅडम, पर्यवेक्षक दत्ता येडमे,एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे,समिती प्रमुख प्रा सौ नंदा अवघडे उपस्थित होत्या.

सर्वप्रथम वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, श्री तुकाराम धुर्वे सर यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच विद्यार्थिनी समीक्षा येवले,आरोही चिलबुले,आर्या थोरात, प्रेरणा जाधव,आचल जाधव यांनी सुद्धा प्रकाश टाकला,देवराव जाधव यांनी गीत सादर केले तसेच वर्ग आठ जी च्या विद्यार्थिनींनी गीत सादर केले.

संचालन संतोष मुंगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल शेळके यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये