ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस निरीक्षक भास्कर कुंदावार यांचा सेवानिवृत्ती सत्कार

अडतीस वर्षाच्या सेवेला गावकऱ्यांची मानवंदना

चांदा ब्लास्ट

पोंभुर्णा तालुक्यातील दिघोरी येथील मुळचे रहिवासी व बल्लारपूर येथील पोलीस स्टेशन याठिकाणी कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक भास्कर वामराव कुंदावर यांनी पोलीस प्रशासनात अडतीस वर्षे प्रशासकीय सेवा देत नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवेला मानवंदना देण्यासाठी स्थानिक नाट्य कला मंडळ आणि गावकऱ्यांच्या मदतीने सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार यांचा सेवानिवृत्ती भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रम दरम्यान भास्कर कुंदावार यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून गीतगायनाच्या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरगच्च रंगलेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार मुर्ती सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार तसेच झाडीपट्टीतील विनोदाचा बादशाह, नाट्य कलावंत अरविंद झाडे यांचासुध्दा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जन्मगाव असलेल्या दिघोरी या गावात झालेल्या सत्कार समारंभाने सत्कारमूर्ती भारावून गेलेत. प्रशासकीय सेवेत असताना घेतलेले समाजसेवेचे कार्य निरंतर सुरू राहणार असल्याचे मत सत्कारमूर्ती भास्कर कुंदावार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर सिडाम, सुधिर वागदरकर यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये