ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती,”वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले, कनिष्ठ महाविद्यालयात गडचांदूर येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ ला *डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती ” वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.* याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्ममाला अर्पण अभिवादन करण्यात आले.

      सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री संजय गाडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख प्रा. दिनकर झाडे, परीक्षक तथा मार्गदर्शक प्रा. डॉ शरद बेल्लोरकर, प्रा. डॉ. माया मसराम उपस्थित होत्या याप्रसंगी जयंती निमित्त मार्गदर्शकांनी आपले विचार व्यक्त केले *डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वप्नातील विकसित भारत* यावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली,यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये कला विभागात प्रथम क्रमांक कु. श्रुतिका दातारकर द्वितीय क्रमांक कु. जानवी यादव तृतीय क्रमांक नंदलाल घाटे तसेच विज्ञान विभागामध्ये प्रथम क्रमांक कु. प्रतंक्षा आडे द्वितीय क्रमांक महावीर राठोड यांनी पटकावले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनामध्ये यांचे विचार व कार्य आजच्या तरुणांनी अंगीकारले पाहिजे असे महत्त्व पटवून दिले.

      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन अशोक सुरपाम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. नितीन टेकाडे यांनी केले.

     सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. अशोक सातारकर प्रा. जहीर सय्यद प्रा. राजेश बोळे प्रा. अनिल मेहरकुरे प्रा. सोज्वल ताकसांडे प्रा. शिल्पा कोल्हे, प्रा. प्रवीण डफाडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करण लोणारे, स्नेहल चांदेकर, शशिकांत चन्ने व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये