ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमृतनगर प्रभाग क्र. ५ मध्ये SIR नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बांधकाम सभापती विष्णू झोरे व व्हॉईस ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील अमृतनगर प्रभाग क्रमांक ५ येथे नगर परिषद बांधकाम सभापती विष्णू झोरे तसेच व्हॉईस ऑफ मीडिया तालुका उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने SIR नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत SIR नोंदणी करून घेतली. नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी BLO अनिल बुरकुल, BLO राजेंद्र पंजरकर, BLO शेख मसूद आणि BLO अब्दुल मसूद यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.

या शिबिराला पत्रकार राहुल नायर, अशरफ पटेल, सागर सवडे, कृष्णा सोनवणे, अहमद खान यांच्यासह इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी वेळेत SIR नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

यावेळी विष्णू झोरे व विजय जाधव यांनी नागरिकांना शासनाच्या सूचनांनुसार वेळेत SIR नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये