ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरजू विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींनी मदत करावी _ डॉ. रामदास शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जायंटस ग्रुप ऑफ देऊळगाव राजाचे वतीने शहरातील बायपास मार्गावरील स्वामी विवेकानंद माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील गरजवंत विद्यार्थिनीना दिनांक 18 जुलै 26 रोजी याच विद्यालयाचे कार्यालयात गणवेश चे वाटप करण्यात आले यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रामदास शिंदे यांनी सांगितले की गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिल्यानंतर त्यांचे चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासारखे असते त्यांना जो आनंद मिळतो त्याचे मूल्यमापन करणे फार अवघड आहे प्रत्येक विद्यालयात अशा गरजवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना दानशूर लोकांनी पुढे येत त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवत त्यांना गणवेश चे वाटप केले तर इतर समाजही अशा कार्यासाठी पुढे येईल.

  शैक्षणिक वर्षात जायंटस ग्रुप या समाजसेवी संस्थेच्या वतीने शहरात व तालुक्यातील काही शाळांमध्ये 400 विद्यार्थिनिना गणवेश चे वाटप केले दिनांक 18 जुलै 26 रोजी स्वामी विवेकानंद प्रार्थमिक व माध्यमिक विद्यालयातील 51 विद्यार्थिनींना गणेशचे वाटप संस्था अध्यक्ष डॉक्टर रामदास शिंदे सचिव ॲड.किशोर खवडे, फेडरेशन अध्यक्ष जुगल किशोर हरकूट, सचिव सन्मती जैन, जायंटस ग्रूप चे अध्यक्ष किशोर अंबुस्कर, संजय डोणगावकर, अरुण कायस्थ, दामोदर राठी, श्याम गुजर, कल्याण चांडगे, मनीष काबरा, संजय सराफ, ललेश अक्करबोटे, यांचे हस्ते करण्यात आले. संचालन मुख्याध्यापक हरिदास भांबर्गे यांनी केले यावेळी संस्थेचे उध्दव चेके ज्ञानेश्वर पऱ्हाड,कीर्तीकुमार अंबुस्कर, रुपाली पडघान, कल्पना शिंगणे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये