ताज्या घडामोडी

चंद्रपूर गार्डन सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने फ्लॉवर शो चे यशस्वी आयोजन

विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर गार्डन सोसायटी व इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 12 जानेवारी रोजी आय एम ए हॉल मध्ये भव्य फुलांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामुळे झाडांचे संवर्धन आणि निसर्गाविषयी प्रेम बालकांमध्ये रुजविण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली.

या फुलांच्या प्रदर्शनामध्ये फुलांच्या मांडणीच्या स्पर्धा, बोन्साय झाडे, पॉटस्केप मिनिएचर गार्डन, आरोग्यदायी गुलाब, ताज्या फुलांच्या दागिन्यांच्या स्पर्धांना निसर्गप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. याशिवाय, फुलांच्या मांडणीवर आयोजित केलेली मोफत प्रात्यक्षिक क्लास प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरली. त्याचप्रमाणे प्रदर्शनामध्ये फुलांच्या कुंड्या, खतांचा व झाडांच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यांनी लोकांचे विशेष लक्ष वेधले.

फ्लॉवर शो च्या यशस्वी आयोजनासाठी गार्डन सोसायटीच्या अध्यक्षा शाहीन अहमद, उपाध्यक्षा अदिती तातावार, खजिनदार ॲडव्होकेट विजया बांगडे, सचिव संजाली चौहान, सल्लागार डॉ. पल्लवी अलुरवार, वर्षा दत्तात्रय यांचेसह आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंतखजिनदार डॉ. अप्रतीम दीक्षित यांचेसह दोन्ही संस्थांच्या संपुर्ण कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये