ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणा-या 1 हिरोहोंडा वाहन चालक, 1 वाहन जप्त यांचेवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 22/07/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 22/07/2026 रोजी वर्धा पेट्रोलींग दरम्याण पोहवा मुकेश राऊत ब.क 1265, पोहवा चंद्रकांत तपासे ब.क 1492, पोहवा शब्बीर सैयद ब.क 814, पोहवा संतोष राठोड ब.क 1427, पोशि प्रदीप कोहले ब. क 983 यांनी ईतवार वर्धा येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक क्रमांक MH 32 T 9282 हिरोहोंडा चा चालक नामे लहानेश्वर महादेव चौधरी वय 57 वर्ष रा. रामनगर वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत घालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्षा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 68.3 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.

वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण 259 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 59 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 3768. केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192(अ) एकुण 113 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर दुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

पाटील साहेब पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये