मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा भाजपातर्फे भव्य रक्तदान शिबिर
६१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला युवक, महिला, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
लोकनेते मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेने तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश भैय्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना “रक्तदान हेच श्रेष्ठदान” असल्याचा संदेश देण्यात आला. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.
भाजपा पोंभुर्णा तालुकाध्यक्ष हरीश ढवस यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सेवाभावी उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
तालुका अध्यक्ष हरीश ढवस, राहुल संतोषवार माजी जी प सदस्य, अजित मंगलगिरीवार, उपाध्यक्ष न. प. पोंभुर्णा, सुलभा पिपरे नगराध्यक्षा न. प. पोंभुर्णा, ज्योतीताई बुरांडे, महामंत्री, गुरूदास पिपरे महामंत्री, विनोद देशमुख महामंत्री, राहुल पाल ता. उपाध्यक्ष, रजिया कुरेशी, सुनीता म्यॅकलवार जमणादास गोवर्धने, ऋषीं कोटरंगे, दर्शन गोरन्टीवर, गंगाधर मडावी, अजय मस्के, नैलेश चिंचोलकर, अरुण कुत्तरमारे, विकास दिवसे, बंटी दहिवले, शंकर वाकूडकर, मनोज भोयर, अतुल chudhari, विनोद दिवसे, रोशन ठेंगणे



