ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची कार्यवाही

एकुण 45 लाख रू. चा मुद्देमाल ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन अल्लीपुर ने अवैध वाळु उत्खणनाबाबत मोर्चा उभारून एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करून किमती मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही मध्ये पोलीसांकडुन फौजदारी गुन्हे तसेच दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

दिनांक 01.05.2024 रोजी रात्री 02.00 वाजता दरम्याण वर्धा नदीचे काठावर असलेल्या साती घाटावर अल्लीपुर पोलीसांनी अवैद्य वाळु उत्खनन बाबत कार्यवाही करून घटनास्थळावरून वाळु वाहतुक करणारे एकुण 55,00,000/- रू किमतीचे 3 टिप्पर ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे जप्त करण्यात आले.

तसेच मागील काही दिवसांपासुन यवतमाळ जिल्ह्यातील वाळु तस्कर हे जिल्हा सिमेचे उल्लंघन करून वर्धा जिल्ह्यातील ग्राम कात्री लगत वर्धा नदीतुन बोटीचे व मशिनचे सहायाने वाळुचे अवैद्य उत्खणन करीत होते. त्याबाबत अल्लीपुर पोलीसांना माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचुन दिनांक 01.05.2024 रोजी दुपारी 03.00 वाजताचे दरम्याण कात्री घाट येथे धडक कार्यवाही करून अवैद्रद्यरीत्या वाळु उत्खणन करण्याकरीता वापरल्या जाणारी बोट व मशिनरी किमंत 5,00,000/- रू व पोकलॅन्ड मशिन किंमत 40,00,000/- रू असा एकुण 45,00,000/- रू चा मुद्देमाल ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी अल्लीपुर पोलीसांनी आरोपी अष्फाक षेख, रा. वर्धा (फरार) रोहीत सुर, रा. वरोरा, जि. चंद्रपूर (फरार)अप.क्र. 216/2024 कलम 379, 420, 511, 34 भादवि यांचे विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करित आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुले, पो.हवा राहुल नव्हाते, ना.पो.अं.अनुप नाईक, ना.पो.अं. प्रफुल चंदनखेडे, पो.अं. सतिश हांडे, पोअं. योगेश चंदनखेडे, पोअं. गणेश कन्नाके यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये