ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “आमची जमीन” या घोष वाक्याखाली जमीन पुनरसंचहित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

यावेळी रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि जैवविविधतेचे नुकसान यासारख्या पर्यावरणीय समस्या बद्दल जागरूकता करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले व तसेच या दिवशी महाविद्यालयीन परिसरामध्ये झाडे लावण्यात आली.

याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे प्रा अश्विनी जाधव, प्रा नारायण बोडखे प्रा. मोहजीतसिह राजपूत, प्रा विलास सातपुते, प्रा अरविंद देशमाने व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये