Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची बी बियाण्यांसाठी होणारी लुटमार त्वरित थांबवा

काँग्रेस पक्षाचे तालुका कृषि अधिकारी यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर होणारी लुटमार त्वरित थांबवा अशी मागणी देऊळगाव राजा तालुका व शहर काँग्रेस पक्षाचे वतीने तालुका कृषि अधिकारी यांना निवेदन देऊन कऱण्यात आली आहे

अगोदरच शेतकरी मागील वर्षी दुष्काळा मध्ये होळपळून निघाला आहे, या वर्षी चांगल्या हवामानाचे व पावसाचे अंदाज वर्तविले असल्याने शेतकरी पेरणी साठी आवश्यक असलेले बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर जात आहेत परंतु तेथे सुद्धा संपुर्ण तालुक्यात शेतकऱ्यांची ऑन लाईन च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे.

अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे योग्य दरात उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांनी या संदर्भात न्याय कोणाकडे मागायचा,अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे योग्य दरात उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तालुक्यात कोणत्या कंपनीचे बि बियाणे कोणत्या कृषी केंद्रावर किती प्रमाणात उपलब्ध आहे व सदर उपलब्ध बियाणे किती शेतकऱ्यांना वाटप केले याची संपुर्ण माहिती देण्यास यावी व शेतकऱ्यांची सुरू असलेली आर्थिक लूट शासन स्तरावरून ताबडतोब थांबविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे वतीने तालुका कृषि अधिकारी भगवान कछवे यांना आज दिनांक 7जून ला देण्यास आले.

कृषि विभागाने तात्काळ कारवाई केली नाही तर काँग्रेस पक्षाचे वतीने तालुका कृषि अधिकारी कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे, निवेदन देताना तालुका कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड, शहर अध्यक्ष विष्णू झोरे, तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष गजानन तिडके,माजी नगरसेवक हनीफ शहा, सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश कायंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा दिलीप सानप, माजी नगर सेवक लक्ष्मण कव्हळे, मुन्ना ठाकूर,प्रा अशोक डोईफोडे, अमर शेटे, सचिन मुंढे, नितीन पटोळे,गणेश सरोदे, विठ्ठल सरोदे, मुबारक खान व इतर उपास्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये