ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे युवा-युतीसाठी एमएससीआयटी प्रशिक्षणाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे शिक्षणाची गुणवत्ता आणि आधुनिक सुविधांच्या विकासात सदैव तत्पर आहे. विद्यार्थ्यांची गरज आणि संगणकाचे महत्व लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे एमएससीआयटी प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक ७ जुन ला करण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन ग्रामपंचायत नांदा चे उपसरपंच श्री. पुरुषोत्तम आस्वले व श्री. सतीश कुमार मिश्रा सेक्शन हेड (एडमिन) आवारपूर सिमेंट वर्क्स यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला सीएसआर प्रमुख प्रतीक वानखेडे, किरण करमरकर व मोहर्ष कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे शिक्षक श्री. गणेश पिंपळकर सोबत संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही उपस्थित होती. या २ महिण्याच्या MS-CIT संगणक प्रशिक्षणामध्ये सभोवताली गावातील एकूण शंभर विद्यार्थ्यांना IT जागरुकता, साक्षरता व कार्यक्षमता आणि डिजिटल-नॅालेज-डेवलपमेंट डिव्हाईड याला एक स्तरावरुन प्रशिक्षणाच्या माध्यमातुन विद्यार्थांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थांना सरकार मान्य प्रमाणपत्र सुध्दा प्रदान करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता देविदास मांदाळे यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये