ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत आज शेतकऱ्यांची राज्यस्तरीय जनसंसद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            म.रा.शेतकरी संरक्षण समिती आणि भारतीय जनसंसद यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन दि.७ जूनला सकाळी ११ वाजता स्थानीय राजमनी लॉन गवराळा येथे पार पडणार आहे.या मेळाव्यात शेतकरी, शेतमजुर यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंसद राज्य अध्यक्ष अशोक सब्बन तर मूख्य मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागिय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी या राहतील.या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलिस अधिक्षक ममुक्का सुदर्शन, मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर,जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार,संध्या चिवंडे,मुख्य महाप्रबंधक प्रमोदकुमार,अॅड. भुपेंद रायपूरे हे उपस्थित राहतील.या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये