भद्रावतीत संविधान नागरिक संवर्धन समिती तर्फे संविधान दिन समारोहाचे आयोजन
विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कलात्मक सादरीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संविधान नागरिक संवर्धन समिती, भद्रावती तर्फे संविधान दिनाचे औचित्य साधत भव्य सांस्कृतिक समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बसस्टॉप, भद्रावती येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात लाठी-काठी प्रदर्शन, ग्रुप डान्स, आदिवासी सांस्कृतिक नृत्य, पथनाट्य, गीत गायन तसेच प्रमुख आकर्षण विपीन तातड, झुंड चित्रपट फेम – सुप्रसिद्ध रॅपर (गायक) यांचे रॅप सॉंग अशा विविध कलात्मक सादरीकरणांचा समावेश होणार आहे.
समारोहाचे उद्घाटन दिनेश कातकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एड. दिव्या सम्राट वाघमारे राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार बालाजी कदम सर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी मॅडम, पोलिस निरीक्षक-योगेश्वर पारधी सर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रणय कांबळे, कृतांत सहारे, राजरतन पेटकर, वैभव पाटील, कुलीन शेंडे, स्वप्निल बनकर, संकेत चिमुरकर, जय दारूंडे, रोशन पेटकर, नंदू साळवे, मनोज मोडक व मृगन पाटील यांनी आयोजनाची धुरा सांभाळली आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व संविधान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी रोहित भेले, मिलींद रामटेके, अमन देवगडे, अक्षय पाटील, प्रेम सपकाळ, सुमेध कवाडे, प्रियांशु जगताप, सौरभ रामटेके, साहिल राहुलगडे यांनी आवाहन केले आहे.



