ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिखली खुर्द येथून घर चलो अभियान!

माजी उपसभापती महेश देवकते यांची सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभर सुरू असलेल्या मोदी@९ महा-जनसंपर्क तथा घर चलो अभियानाच्या पार्श्वभूमीवर माजी उपसभापती महेश देवकते यांनी तालुक्यातील चिखली खुर्द गावापासून घर चलो अभियानाला सुरवात केली आहे.
यादरम्यान त्यांनी तालुक्यातील चिखली खुर्द, पाटागुडा येथे घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना मोदी सरकारच्या ९ वर्षांतील योजना व विकासकामांची पत्रके देत माहिती दिली. यासोबतच आगामी काळात मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी ठिकठिकाणी केलेल्या मनोगतातून केले.
यावेळी  चिखली खुर्द येथील विविध विकास कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या जनसुविधा या योजनेतील विकास कामाचे भूमिपूजन महेश देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी सरपंच वर्षाताई सुनील जाधव, उपसरपंच सौ सुनिता चंद्रभान केदासे, तंटा मुक्त अध्यक्ष नरसिंग कोळगिर, पेसा अध्यक्ष लहुजी मरडेवाड, बालाजी फड, शेषेराव बोळगिर, विजय तांबुळगे,नारायण भनगिर, मधुकर येटेवाड, अंबादास कंचकटले, मधुकर बंडगर, गोविंद दुबले, पंढरी भोइनवाड, मिरा विजय पवार, नामदेव राठोड, संगीता रायवाड, वणाबाई  गायकवाड, डॉ शंकर कांबळे नामदेव पिटलेवाड, चंद्रभान केदासे, रोहिदास कांबळे, गोविंद परकड, राजू तांबुळगे,रंजना पिटलेवाड, आदिंसह मोठ्या संख्येने ठिकठिकाणी ग्रामस्थांची उत्स्फुर्त उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये