Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री कन्‍यका महिला मंडळा तर्फे सामुहिक लघुरूद्र संपन्‍न

चांदा ब्लास्ट
दि. २६ ऑगस्ट रोजी येथील श्री कन्‍यका महिला मंडळाने भव्‍य सामुहिक लघुरूद्र पूजेचे आयोजन केले होते. अकरा ब्राम्हणांच्‍या मुखातून रूद्रस्‍तोत्राच्‍या वेदघोषाने अवघे कन्‍यका सभागृह मंत्रभारीत झाले होते. ३५ जोडप्‍यांनी या लघुरूद्र पूजेचा लाभ घेतला. त्‍या सर्वांची उत्‍तम आसन व्‍यवस्‍था,यथासांग पूजा सामुग्री, नयनरम्‍य सजावट यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.
सुरुवातीला सर्व जोडप्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. तदनंतर तांडवनृत्‍य व दिपप्रज्वलन करून पूजेला सुरूवात करण्‍यात आली. साडेतीन तास चाललेल्‍या पूजेनंतर संपूर्ण आर्यवैश्‍य समाज बांधव समाधानाने तृप्‍त झाले. इतके अप्रतिम आयोजन यापूर्वी कधीही झाले नसल्‍याचे सर्वांचे मत होते. श्री कन्यका महिला मंडळाच्‍या अध्‍यक्षा श्रध्‍दाताई मुनगंटीवार यांनी आपल्‍या कार्यकारिणी सोबत या सुंदरशा सोहळयाचे आयोजन केले होते.
रूद्रभिषेकात भगवान शिवाची पूजा केली जाते. श्रावण महिण्‍याच्‍या पर्व काळात रूद्रपूजा अधिक फलदायी असते व सर्वांनाच एवढया मोठ्या पूजेचा घाट घरी घालणे शक्‍य होते नाही. त्‍यामुळेच श्री कन्‍यका महिला मंडळाने या सामुहिक रूद्रपुजेचे आयोजन केले होते. त्‍याचा अनेक जोडप्‍यांनी लाभ घेतात. अंजली बिरेवार यांनी संचालन केले नयनरम्‍य सजावट अमृता तुम्‍मुरवार यांची होती. अनोखे स्वागत करून अप्रतिम तांडवनृत्य सादर झाले. सौ चंदा नालमवार, ज्‍योती कोतपल्‍लीवार, मेघा कुल्लरवार, साधना कोमरवल्‍लीवार,  लता बोंगीरवार, पल्‍लवी भास्‍करवार, विजया विरमलवार, वर्षा ताटीवार, भावना तन्‍नीरवार, राधा उपगन्‍लावार यांनी कार्यक्रमाच्‍या यशस्वितेकरिता अथक प्रयत्‍न केले. अनेक गणमान्‍य भगिनींची व कुटूंबियांची उपस्थिती होती. कन्यकामंडळ अनेक स्तुत्य उपक्रम घेतात. सामुहिक सत्यनारायणपूजा, सामुहिक लघुरुद्राच्या यशस्वी आयोजनाने आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला असे अध्‍यक्षा  श्रद्धाताई श्रीपाद मुनगंटीवार कळवितात.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये