ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुरातील अवैध दारू विक्रेत्यांना पोलीसांचा आशिर्वाद

संतोष पटकोटवार यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदुरातील अवैध दारू विक्रेत्यांना पोलीसांचा आशिर्वाद असल्याचा आरोप माजी ग्राम पंचायत सदस्य तथा शेतकरी संघटनेचे सरचिटनिस संतोष पटकोटवार यांनी केला आहे.

      चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणारी नगर परिषद म्हणजे गडचांदुर होय, येथे पाच देशी दारूची दुकाने व पंधरा ते सोळा बियर बारची दुकाने आहेत, येथे सिमेंट कंपनी असलयाने सिमेंट च्या कामा करीता कामगार व हमाल वर्ग भरपूर प्रमाणात आहेत, त्यांना थकवा दूर करण्यासाठी दारूचा आसरा घ्यावाच लागतो
दारूची दुकाने सकाळी दहा ते रात्री दहा वाजे पर्यंत बारा तास पूर्ण वेळ सुरू असतात परंतु तळीरामांना बारा तास सुध्दा अपुरे पडु लागले की काय ??असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे,दिवसभरात केलेल्या कमाईचे संपूर्ण पैसे दारूसाठी ऊधळत असल्याने संसारात बाधा निर्माण होत आहे व मुलांना शिक्षणात अडचणी निर्माण होत असून अनेक अपेक्षा भंग होत आहे,अशातच रात्रीच्या वेळेत अवैध दारूची विक्री जोमात सुरू असल्याने तळीरामांची ‘ना घर का ना घाट का”अशी अवस्था पहायला मिळत आहे.

गडचांदुर येथील अवैध दारू विक्री बंद करण्या विषयी मा, ठानेदार साहेबांना काही महिने पूर्वी निवेदन देण्यात आले मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांची हिमत चांगलीच वाढलेली दिसते, रात्री मिळणाऱ्या या अवैध दारू मुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाले असून काही कुटुंब नस्तनाभुज होण्याच्या मार्गावर आहेत. या अवैध दारूच्या विक्रीमुळे तळीरामांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून दारूच्या अतिसेवनाने मानसिक संतुलन बिघडण्याच्या मार्गावर आहे. ही अवैध दारू विक्री बंद होणे फार गरजेचे आहे.

परंतु पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्यांशी हातमिळवणी केल्याचे नागरीकात बोलले जात असून दारू विक्रेत्यांना काही पोलीसांचा आशिर्वाद असल्याचा सणसणीत आरोप माजी ग्राम पंचायत सदस्य तथा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये