ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपरिषद संचालित शाळांच्या नावात होणार बदल

थोर पुरुषांच्या नावाने ओळखल्या जाणार ; प्रशासकीय ठरावानुसार मान्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

नगर परिषद देऊळगाव राजा संचालित प्राथमिक/माध्यमिक /उच्चमाध्यमिक शाळांच्या नावात बदल करणेबाबत शिवसंग्राम संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सदर शाळांना थोर महापुरुषांचे नाव देणे बाबत प्रशासकीय अधिकारी श्री अरुण मोकळ यांनी प्रशासकीय ठरावानुसार मान्यता दिली आहे.

नगरपरिषद देऊळगाव राजा संचालित असलेली शाळा म्युनिसिपल श्री शिवाजी हायस्कूल या नावात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने अवमान होत होता. म्हणून सदर शाळेच्या नावात बदल करून छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असे करावे.तसेच नगरपरिषद मराठी माध्यमिक शाळा क्र 1 ते 4 व उर्दू प्राथमिक शाळेंना थोर महापुरुषांची नावे द्यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

त्यानुसार नगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांनी प्रशासकीय ठरावानुसार शाळेच्या नावात बदल करण्यास मान्यता दिली आहे. सदर प्रशासकीय ठरावानुसार श्री शिवाजी हायस्कूलचे “छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय” तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक 1 ते 4 यांना ” क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले न. प. मराठी प्रा. शाळा क्र.1, छत्रपती राजश्री शाहू महाराज न. प. मराठी प्रा. शाळा क्र.2,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे न. प. मराठी शाळा क्र.3, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर न. प. मराठी प्रा. शाळा क्र.4 आणि प्रथम शिक्षिका फातेमा शेख न. प. उर्दू प्रा. शाळा क्र.1 या महापुरुषांचे नाव देण्याबाबत प्रशासकीय ठरावानुसार मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे थोर महापुरुषांचा एक प्रकारे सन्मान होणार असून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.

सदर प्रशासकीय ठराव मंजूर केल्याने पालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री अरुण मोकळ यांचा शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिव फुले शाहू आंबेडकर आझाद यांच्या विचाराच्या नागरिकांनी मुख्याधिकारी श्री अरुण मोकळ यांचा सत्कार केला व अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये